Vihir Yojana | विहीर योजना | मागेल त्याला शेततळे योजना

विहीर योजना

मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.अनियमित, अपु-या पावसामुळे गेल्या काही वर्षात राज्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. यावर शाश्वत व कायमस्वरुपी उपाययोजना करणेची आवश्यकता आहे.पावसाच्या अनियमिततेमुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही व पाण्याअभावी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो त्यामुळे शेतीपिकांच्या सिंचनासाठी विहिरींमधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते परंतु विहीर खोदण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते व राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत त्यामुळे पैशांअभावी शेतकरी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या समस्येचा विचार करून राज्य शासनाने राज्यात पंचायत समिती विहीर योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय हाती घेतला.

विहीर योजना- Highlights

विहीर योजना- Highlights
योजनेचे नावविहीर योजना 2024
राज्यमहाराष्ट्र
विभागकृषी विभाग
लाभ4 लाख रुपये अनुदान
उद्देश्यशेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक अनुदान
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
GR Notification PDFClick Here
मागेल त्याला विहीर योजना अर्जClick Here

मागेल त्याला विहीर योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेती पिकांच्या सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने मागासवर्गीय विहीर योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्राकडे प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये.
  • शेतीसाठी पाण्याचा स्रोत निर्माण करून देणे तसेच पाण्यासाठी आत्मनिर्भर बनविणे व पाण्याअभावी शेती पिकांचे होणारे नुकसान टाळणे

मागेल त्याला विहीर योजनेचे वैशिष्ट्य:

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगाच्या) माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे हे Magel Tyala Vihir Yojana 2024 चे महत्वाच वैशिष्ट्य आहे.
  • राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट ही रद्द केलेली असून आता जास्तीत जास्त लोकांना मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाईल.
  • मागेल त्याला विहीर अनूदान योजनेला पंचायत समिती विहीर योजना या नावाने देखील ओळखण्यात येते.
  • राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

मागेल त्याला विहीर योजनेचे लाभार्थी:

  • भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती
  • अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती
  • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी.
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती
  • जॉब कार्ड धारक व्यक्ती
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती
  • इतर मागास वर्गातील शेतकरी
  • सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला
  • कुटूंबामध्ये आत्महत्या झालेली आहे त्यांचे वारसदार
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत.
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
  • जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
  • नीरधीसूचित जमाती
  • अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • दारिद्र्यरेषेखाली कुटुंब

मागेल त्याला विहीर शेतकऱ्यांना होणारा फायदा:

  • विहीर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेती पीक सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल.
  • पाण्याअभावी शेत पिकांचे नुकसान होणार नाही.
  • शेतकरी शेतीसाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील.
  • शेतकरी शेती क्षेत्राकडे पाठ फिरवणार नाहीत.

मागेल त्याला विहीर अर्जदारासाठी आवश्यक पात्रता:

  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे

मागेल त्याला विहीर अर्ज करताना लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • जमिनीचे कागदपत्रे 7/12 व 8अ
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
  • सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र

Online Application Process:

  • अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्राम पंचायत कार्यालयात जावे लागेल व ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

 Vihir Yojana Apply Online:

  • अर्जदार शेतकऱ्याला विहीर अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर मागेल त्याला विहीर योजना यावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल व सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील व सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

Other Post

NABARD Bharti 2024 | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 108 जागांसाठी भरती

Bandhkam Kamgar Yojana | बांधकाम कामगार योजना

1 thought on “Vihir Yojana | विहीर योजना | मागेल त्याला शेततळे योजना”

Leave a Comment