Germany job vacancy & language free course apply
जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उपलब्ध कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्यासंदर्भात असणारी पार्श्वभूमी खालील प्रमाणे आहे.-
युरोपीय युनियन मधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत तथापि मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे या मनुष्यबळासाठी एकतर तुलनेने रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत शिवाय जे काही रोजगार उपलब्ध आहेत त्यातून समाधानकारक अर्थार्जन होत नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपीय युनियन मधील देशांना करता यावा व त्यायोगे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी आणि दोन्ही देशांमधील संबंध सुदृढ होतील व अनेक सशक्त सामाजिक व आर्थिक बदलांची सुरुवात जागतिक स्तरावर होऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलन व तंत्रज्ञान प्राप्त होईल हा शासनाचा दृष्टिकोन आहे. यासाठी माननीय मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली या विभागाच्या दिनांक 31.5.2023 रोजीच्या संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये कृतीदलाचे गठन करण्यात आले होते. या कृतीदलात या विभागाबरोबरच उच्च व तंत्र उद्योजकता, उद्योग, कृषी व वैद्यकीय शिक्षण या विभागांच्या मा. मंत्री महोदयांचा व सचिवांचाही समावेश आहे. कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याची जबाबदारी या कृतीदलाकडे सोपवण्यात आली होती. सन 2015 मध्ये जर्मनीतील बाडेन -वूटेनबर्ग या राज्याशी सिस्टर्स स्टेट रिलेशनशिप अंतर्गत महाराष्ट्र राज्याने कौशल्य वृद्धीबाबत सामंजस्य करार केला असल्याची पार्श्वभूमी विचारात घेऊन व या राज्याची कुशल मनुष्यबळाची मोठी गरज विचारात घेऊन त्या राज्यास कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे उचित ठरेल या विचारांती कृतीदलाने त्या दृष्टीने प्रयत्न केले. यासाठी दोन्ही बाजूच्या बैठका संपन्न झाल्या बाडेन -वूटेनबर्ग या राज्याशी सामंजस्य करार करण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सादर करण्यात आला व त्यांच्या मान्यतेनंतर दोन्ही राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिनांक 25.2.2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आले . germany language free course .
The following is the background regarding the approval of the pilot project to the state of Baden-Wuttenberg in Germany for providing skilled manpower available in various sectors in Maharashtra. Most of the countries in the European Union are industrially prosperous, but for the past few years these countries have been facing shortage of skilled manpower. Skilled manpower in various fields is available in the state of Maharashtra in a large amount, but the employment opportunities are relatively less for this manpower and it has been seen that there is no satisfactory income from the few jobs that are available. The skilled manpower available in the state should be supplied to the countries of the European Union and thereby help them to raise their standard of living by providing employment opportunities and the relations between the two countries will be strengthened and many strong social and economic changes will be initiated at the global level and a large amount of foreign exchange and technology will be obtained. Government’s view is that it will happen For this, a Task Force was constituted under the Chairmanship of the Hon’ble Minister (School Education) vide Government Resolution No. 1 dated 31.5.2023 of this Department. In this task force, along with this department, higher and technical entrepreneurship, industry, agriculture and medical education departments. Ministers and secretaries are also included. This task force was entrusted with the responsibility of determining the procedures for supply of skilled manpower.In the year 2015, the task force made efforts in this regard, taking into account the fact that the state of Maharashtra signed a memorandum of understanding with the state of Baden-Wuttenberg in Germany regarding skill enhancement and considering the great need of skilled manpower of this state, it would be appropriate to supply skilled manpower to that state.For this, the meetings of both the sides were concluded. The proposal for permission to enter into MoU with the state of Baden-Wuttenburg was submitted to the Ministry of External Affairs of the Union Government and after their approval, the MoU was signed on 25.2.2024 in the presence of the chief officials of both the states. germany job vacancy language free course
Objective/ उद्दिष्ट
- महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक कौशल्या 2024/P.No.51/SD-6 नुसार 11 जुलै 2024 रोजी जर्मन भाषेचे प्रशिक्षण देईल. त्यानंतर आवश्यक कौशल्य वर्धन प्रशिक्षण दिले जाईल. फक्त इच्छुक उमेदवारांनी हा अर्ज भरावा.
- महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वे, कायदे, नियम आणि सूचनांचे पालन करावे लागेल. अंतिम निवडीनंतर, तुम्ही बॅडेन-वुटेनबर्ग सरकारने सेट केलेल्या 30 कौशल्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्यातील 30 कौशल्य-आधारित उपक्रमांसाठी पात्र व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवारच हा अर्ज भरू शकतात, असे सरकारने म्हटले आहे.
- या योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले लोक गृहीत धरतात की त्यांना जर्मन राज्यात बॅडेन-वुर्टेमबर्ग किंवा जर्मनीमध्ये नोकरी मिळेल. यासाठी उमेदवारांना जर्मन भाषेचे आवश्यक प्रमाणपत्र मिळवावे लागेल, शासन निर्णयात नमूद केलेले कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील आणि संस्था किंवा संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये निवड व्हावी.
- अर्जदारांना बॅडेन-वुटेनबर्ग राज्यात काम करण्याची, व्हिसा मिळण्याची आणि तेथे स्थायिक होण्याची सुविधा मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकार जर्मनीतील बॅडेन-वुटेनबर्ग राज्याशी समन्वय साधून पूर्ण सहकार्य करेल.
- या प्रकल्पासाठी जर्मन भाषा कौशल्य स्तरानुसार प्रमाणपत्र परीक्षांची नावे आणि अंदाजे कालावधी खालीलप्रमाणे आहे.
GR Link (Germany job vacancy महाराष्ट्र) | Germany job vacancy & language traning course apply PDF |
Germany Job Apply Here | Online Application link apply Here |
जर्मनी मध्ये नोकरीची संधी! महाराष्ट्र शासनाकडून मोफत जर्मन भाषा व नोकरीसाठी मदत – Germany job vacancy महाराष्ट्र शासनाच्या मदतीने राज्यातील युवक-युवतींना जर्मनीत रोजगाराची अभूतपूर्व संधी. पहिल्या टप्प्यात सुमारे १०,००० युवा-युवतींना संधी. यासाठीचे जर्मन भाषा व आवश्यक कौशल्य सुधारण्याचे निवासी प्रशिक्षण पूर्णपणे मोफत. अधिक माहिती व या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे लिंक दिली आहे
Indian Bank Bharti इंडियन बँकेत 300 जागांसाठी भरती Click Here
PM Vishwakarma Scheme पीएम विश्वकर्मा योजना
2 thoughts on “Germany job vacancy 10,000$ job 2024| जर्मनी मधे नोकरीची संधि महाराष्ट्र सरकारकडून मोफत जर्मनी भाषा व नोकरीसाठी मदत”